औरंगाबादच्या ‘दुर्गप्रेमी मॉर्निंग ग्रुप’ची ‘धोडप-रामशेज-रावळ्या-जावळ्या’ गडसंवर्धन मोहीम

good morning group

औरंगाबाद : गड संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या दुर्गप्रेमी मॉर्निंग ग्रुपने नुकतीच नाशिक जिल्ह्यातील धोडप – रामशेज – रावळ्या – जावळ्या ही अतिशय खडतर समजल्या जाणारी गडकोट मोहीम पूर्ण केली. या मोहिमेअंतर्गत दुर्गप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी ९ ते ११ जुलै दरम्यान हे अतिशय खडतर समजले जाणारे किल्ले सर केले. इतकेच नव्हे तर या मोहिमेतील सदस्यांनी या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम देखील राबवली.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धोडप हा किल्ला सह्याद्रीतील साल्हेर किल्यानंतरचा सर्वात उंच किल्ला समजला जातो. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची जवळपास ४७५० फूट आहे. धोडप हा किल्ला चढाईसाठी अतिशय खडतर समजला जातो. तसेच ऐतिहासिक दृष्ट्या देखील या किल्ल्याला मोठं महत्व आहे. याच जिल्ह्यातील आणखी एक किल्ला म्हणजे रामशेज किल्ला ज्याचं इतिहासात मोठं महत्व आहे. त्यांचप्रमाणे सह्याद्री पर्वतरांगेतील जुळे म्हणून ओळख असणारे रावळ्या-जावळ्या हे किल्ले देखील दुर्गप्रेमी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी सर केले. महाराष्ट्राला पराक्रमाचा इतिहास आहे, तो जपला पाहिजे, तो पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे, जो गडकोट संवर्धन केल्यानेच होऊ शकतो. गडकोट हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे त्यांचं संवर्धन, स्वच्छता झाली पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पिढीला इतिहास कळेल.

‘दुर्गप्रेमी मॉर्निंग ग्रुप’ मध्ये सदस्य हे २४ ते ५८ वयोगटातील आहेत. या ग्रुपने अनेक गडकोट मोहिमा राबवल्या आहेत. ज्या मध्ये अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या लिंगाणा, भैरवगड, साल्हेर, अलंग मलंग कुलंग, रायगड या गडांचा समावेश आहे. आयुष्यात कमीत कमी ३६५ किल्ले बघण्याचं आमच ध्येय असल्याचं या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितलं. या मोहिमेमध्ये विश्वास घोळवे, निलेश पाखरे, अड. बी.आर.जायभाय, गोरखनाथ चव्हाण, गणेश बोडके, गोविंद वाकळे, भास्कर मल्ले, गणेश सोनवणे, आबासाहेब निर्वंळ, किशोर घोडके, रवींद्र सपाटे, गुलाब घोळवे, एकनाथ प्रधान, विजय काकडे, निलेश ढवळे, पवन खडके, दत्ता घारे यांचा सहभाग होता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP