डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुकचा दणका, अकाऊंट २ वर्षांसाठी केलं सस्पेंड

donald trump

वॉशिंग्टन : फेसबुकने पुन्हा एकदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का दिला आहे. अमेरिकेच्या संसद परिसरात दंगल भडकावण्याच्या आरोपाखालीदोन वर्षांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींच्या फेसबुक खात्यांबाबत फेसबुकची नियमावली आहे. या नियमावलींचे उल्लंघन झाल्याचे कारण देत फेसबुकने ही कारवाई केली आहे. दोन वर्षांचा कालावधी 7 जानेवारी 2021 पासून गणला जाईल. त्याच दिवशी ट्रम्प यांचे खाते प्रथम निलंबित करण्यात आले होते.

फेसबुकच्या म्हणण्यानुसार ट्रम्प 7 जानेवारी 2023 पर्यंत आपल्या फेसबुक अकाउंटवर प्रवेश करू शकणार नाहीत. म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये  होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्येही त्यांना फेसबुकपासून दूर राहावे लागेल.फेसबुकचे उपाध्यक्ष (ग्लोबल अफेयर्स) निक क्लेग यांनी शुक्रवारी एका ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या 

IMP