रेमडेसिविरसाठी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचे एक तास धरणे आंदोलन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. त्याविरोधात माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक तास धरणे देत निषेध व्यक्त केला.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नाही. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनची देखील कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचे हाल होत आहे. याकडे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार दोघांचेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न अहीर यांनी केला आहे. त्यांच्या विविध मागण्यांचे फलक देखील या वेळी लावण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्र्यांनी अशा प्रकारे आंदोलन करण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असावी.

या आधी देखील माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याचा आरोप त्यांनीही केला होता. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या या इंजेक्शनचा अतिरीक्त साठा मागवण्याची मागणी देखील या वेळी अहीर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

IMP