माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या 21 वर्षांच्या मुलाचं निधन

टीम महाराष्ट्र देशा- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार बंडारू दत्तात्रेय यांचा २१ वर्षीय मुलगा बंडारू वैष्णव याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिकत असलेल्या बंडारू वैष्णवने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला सिकंदराबाद येथील गुरूनानक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी उशिरा त्याचे निधन झाले.

बंडारू दत्तात्रय तेलंगणातील सिकंदराबादचे भाजपा खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये बंडारू दत्तात्रेय हे 2014पासून 1 सप्टेंबर 2017पर्यंत कामगार मंत्री होते. दक्षिण भारतातल्या राजकारणात बंडारू दत्तात्रेय यांची वेगळी ओळख आहे. बंडारू दत्तात्रेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी ते श्रम आणि रोजगार मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील विविध भागात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये भाजपाचा विस्तार करण्यात बंडारू दत्तात्रय यांचे मोठे योगदान आहे.मोदी सरकारमध्येही मंत्री असताना त्यांनी कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले.

You might also like
Comments
Loading...