माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

oscar

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं आज मंगळुरूमध्ये निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

ऑस्कर फर्नांडिस हे जुलैमध्ये योगा करत असताना पडल्यामुळे त्यांना डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

फर्नांडिस यूपीए सरकारमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री होते.ऑस्कर फर्नांडिस काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयं होतं. ते यूपीए सरकारमध्ये रस्ते परिवहन मंत्री राहिले होते.त्यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.

फर्नांडिस यांच्या निधनावर काँग्रेसने ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाने आम्हाला तीव्र दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती आमची संवेदना आहे. ते दिग्गज काँग्रेस नेते होते. त्यांच्या सर्वसमावेश भारताच्या दृष्टीकोणाचा आमच्या काळातील राजकारणावर मोठा प्रभाव पडला होता. काँग्रेसला त्यांच्या मार्गदर्शनाची कमतरता नेहमीच जाणवेल, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :