टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनीही केले पृथ्वी शॉचे कौतुक, म्हणाले….

chapel

श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर मात करत दमदार विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉने केवळ 23 चेंडूत 42 धावा केल्या. त्याने भारताला चांगली  सुरुवात दिली. शॉच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक ग्रेग चॅपल यानांही प्रभावित केले आहे. चॅपेल यांनी शॉच्या  ‘सुधारित तंत्र’चे कौतुक केले आहे.

श्रीलंकेविरुद्ध शॉच्या कामगिरीचे कौतुक करत चॅपल म्हणाले, मी या सामन्याचे हायलाइट्स पाहिले.. ते छान होते. त्याने चांगली सुरुवात केली त्याच्यामुळे तो चांगला खेळ खेळू शकला. सुरुवात चांगली असल्यामुळे पुढे आपली चांगली स्थिती मिळाली. एका प्रसिद्ध वृत्त वहिनीला मुलाखत देताना चॅपल यांनी पृथ्वी शॉ कौतुक करत म्हणाले, ‘पृथ्वीने निःसंशयपणे आपल्या मानसिकतेवर आणि सुरुवातीच्या हालचालींवर काम केले आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

IMP