विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी निधन झाले. किडनीच्या आजारावर त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सांगलीतल्या कोकरुड येथे उद्या (दि.१५) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांनी गृह, ग्रामविकास यासारखी खाती त्यांनी सांभाळली आहेत तर १९९२ ते १९९६ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यात मंत्री अशी दोन्ही पदे त्यांनी एकदाच भूषवली आहेत.यासोबत त्यांनी पक्षात अनेक महत्वाची पदे भुषवली होती. शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख सध्या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत.