शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची हत्या

चॉपरने वार करून करण्यात आली निघृण हत्या

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईतील कांदिवली समतानगरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री चॉपरने वार करून निघृण हत्या करण्यात आली. सावंत रात्री आपल्या मित्रांना भेटून घरी परतताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. इमारतीखाली हे अज्ञात हल्लेखोर गाडीत लपून बसले होते. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

अशोक सावंत रात्री आपल्या मित्रांना भेटून घरी परतताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. समतानगरमधील त्यांच्या इमारतीखाली हे हल्लेखोर गाडीत लपून बसले होते. सावंत इमारतीखाली पोहोचताच या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर चॉपरने वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच सावंत यांचा मृत्यू झाला.

मुंबईतील कांदिवली समतानगरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री चॉपरने वार करून निघृण हत्या करण्यात आली. सावंत रात्री आपल्या मित्रांना भेटून घरी परतताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. इमारतीखाली हे अज्ञात हल्लेखोर गाडीत लपून बसले होते. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, इमारतीच्या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी हल्लेखोरांची चित्र तयार केली असून त्यांची ओळख पटली आहे. त्यापैकी एका गुन्हेगाराचे नाव जग्गा असून अशा अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणात त्याचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फरार झालेल्या या दोन्ही हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.

You might also like
Comments
Loading...