अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा अर्थमंत्रालयाला सल्ला

माजी गव्हर्नर रघुराम राजन

नवी दिल्ली: कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये जगातील सर्व राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना मोठा आर्थिक फटका बसल्याने मंदीच्या छायेत आहेत. याला भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. आता अनलॉक प्रक्रीये दरम्यान अर्थव्यवस्था हळू हळू रुळावर येत आहे. सरकार देखील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले उचलत आहे. मात्र सरकारला देखील मर्यादा असल्याच मत नुकतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केल होत.

या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरु झाली असून यामध्ये अर्थसंकल्पासाठी सूचना मागवण्यात आल्या होत्या, पंतप्रधान मोदींनी अर्थशास्त्रज्ञांची बैठक घेतली. तर यावर्षी देशाच्या इतिहासात पहिले डीजीटल आणि पेपरलेस बजेट सदर करण्यात येणार आहे. तर यासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील अर्थमंत्रालयाला सल्ला दिला आहे.

सरकारला खर्चाची प्राथमिकता निश्चित करावी लागेल, ज्यामुळे गरीब कुटुंब आणि छोटे व्यापारी यांना दिलासा मिळेल, शेअर बाजाराचा फायदा सरकारने घ्यायला हवा, इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च करणे सर्वात चांगले, त्याचबरोबर रोजगार वृद्धी करण्यात यावी. असा सल्ला यावेळी राजन यांनी सरकारला दिला.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. सत्राचे दोन भाग असतील. पहिला भाग 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आणि दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल. संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) या तारखांची शिफारस केली आहे. यावर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेणार आहे.

महत्वाच्या बातम्या