माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने व्हेटिंलेटरवर

pranav mukharjee

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोरी प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. काल त्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर कोरोनाचेही उपचार सुरुच होते.

तर दुसऱ्या बाजूला देशात सोमवारी कोरोनाचे 62,064 नवीन रुग्ण आढळले, तर 1007 जणांचा महामारीत मृत्यू झाला. सलग चौथ्या दिवशी 60 हजारांहून अधिक नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 75 वर गेली आहे. त्याचबरोबर कोरोनाबळींचा आकडा 44 हजार 386 झाला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोमवारपर्यंत 15 लाख 35 हजार 744 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या कोरोनाचे 6 लाख 34 हजार 945 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रविवारपर्यंत कोरोनाचे एकूण 2 कोटी 45 लाख 83 हजार 558 नमुने तपासण्यात आले. यातील 4 लाख 77 हजार 23 नमुने रविवारी एका दिवसात तपासण्यात आले, असे आयसीएमआरने जाहीर केले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी