दिपक चहरबद्दल माजी खेळाडू व्यंकटेश प्रसादचा मोठा खुलासा

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने लंकेचा ३ गडी राखुन पराभव केला. श्रीलंकेने दिलेल्या २७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १९३ वर ७ गडी गमावले असताना दिपक चहरने नाबाद अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

या सामन्यातील खेळीमुळे दिपक चहर एका रात्रीत हिरो झाला. सर्व स्तरातुन दिपकचे कौतुक होऊ लागले. यादरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने दिपक चहर बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी दिपक चहरला उंचीचे कारण दाखवत नाकारले होते. यासंदर्भात प्रसाद यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये व्यंकटेश प्रसाद म्हणाले की,’राजस्थान क्रिकेट अकॅडमीत ग्रेग चॅपेल यांनी उंचीचे कारण दाखवत दिपक चहरला रिजेक्ट केले होते आणि त्याला सल्ला दिला की तु क्रिकेट सोडून दुसरा काही तरी व्यवसाय कर आणि आज हा खेळाडू भारताला एकहाती विजय मिळवुन देतो आणि तेही त्याचे मुख्य कौशल्य नसताना. याचा अर्थ असा होतो की, नेहमी स्वत:वर विश्वास ठेवा आणि परदेशी प्रशिक्षकांना कधीच गांभीर्यतेने घेऊ नका.’ असे म्हणाला आहे.

यावेळी पुढे बोलताना व्यंकटेश म्हणाला की, ‘पण त्यालाही अपवाद आहेत. पण भारतात प्रतिभेची बीलकुल कमी नाहीये. आता ती वेळ आली आहे की फ्रॅचाईजीनी आपल्या संघासाठी भारतीय खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून संधी द्यायला हवी’ ग्रेग चॅपेल हे २००५-२००७ दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP