नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) 2021 ची सर्वोत्तम T20 अकरा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. दानिश कनेरियाने भारताच्या चार खेळाडूंचा आपल्या संघात समावेश केला आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश नाही.
दानिश कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ही टीम निवडली आहे. त्याने 12 जणांचा संघ निवडला आहे, ज्यामध्ये चार भारतीय, तीन पाकिस्तानी, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी दोन खेळाडू आणि न्यूझीलंडचा एक खेळाडू निवडला आहे.
दानिश कनेरियाने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. या दोन्ही खेळाडूंची T20 क्रिकेटमध्ये कामगिरी जबरदस्त राहिली आहे. दोघांनी मिळून ११६५ धावा केल्या आहेत ज्यात पाच शतकी भागीदारी आहेत. दानिश कनेरियाने इंग्लंडच्या जोस बटलरला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे.
कनेरियाने आपल्या संघात चार अष्टपैलू खेळाडूंना स्थान दिले असून हे चार खेळाडूही मधल्या फळीचा भाग असतील. त्यात इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन, ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श आणि भारताचा रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. त्याने अॅडम झाम्पाचा आणखी एक फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केला आहे.
वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर दानिश कनेरियाने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची निवड केली आहे. याशिवाय त्याने न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि भारताचा जसप्रीत बुमराह यांचीही निवड केली आहे. 12वा खेळाडू म्हणून कनेरियाने ऋषभ पंतची निवड केली आहे.
दानिश कनेरियाचा सर्वोत्तम T20 XI खालीलप्रमाणे
मोहम्मद रिझवान, बाबर आझम, जोस बटलर, मिचेल मार्श, लियाम लिव्हिंगस्टोन, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शाहीन शाह आफ्रिदी, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अॅडम झम्पा आणि ऋषभ पंत हे १२वे खेळाडू आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ”दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका
- ‘..तर भाजपने आपल्या १०५ आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी’
- खडसेंनी आता दुकानदारी बंद करावी- गिरीश महाजन
- सहकार क्षेत्र खाजगी लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र चाललेले आहे-देवेंद्र फडणवीस
- ”सहकाराबाबत आम्हाला कुणी सल्ला देऊ नका”, अमित शहांचा शरद पवारांना टोला