अजित पवारांचे कट्टर समर्थक भाजपमध्ये…

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे राष्ट्रवादीचे माजी सहयोगी अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर या प्रवेशाने राजकीय वर्तुळात मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत साहेबराव पाटील अमळनेर मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार म्हणून जाणं पसंत केलं. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. मात्र आता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत साहेबराव पाटलांनी अमळनेर येथे बाजार समितीच्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला आहे.

पहा साहेबराव पाटलांचा भाजप प्रवेश 

You might also like
Comments
Loading...