परमबीर सिंग मुंबईत परतले आणि म्हणाले….

परमबीर सिंग मुंबईत परतले आणि म्हणाले….

Parambir Singh

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांच्यावर खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत. ते परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू होती. खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्यासह विनयसिंह आणि रियाज भाटी यांना मुंबईतील न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले होते. त्याच सोबत राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप देखील त्यांनी केला होता. मात्र तेव्हापासून ते फरार होते.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासही बजावले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारसह सीबीआयला (CBI) न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी परमबीरसिंह यांच्या वकिलांनी ते भारतातच असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. त्यांच्या जिवाला धोका असल्याने ते लपून बसल्याचेही वकिलांनी सांगितले.

फरार माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर तब्बल सहा महिन्यांनी मुंबईमध्ये परतले आहेत. मे महिन्यात वैद्यकीय सुटीवर गेलेले परमबीरसिंह हे अनेक महिने नॉट रिचेबल होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते गुरूवारी मुंबईत दाखल झाल्याचे समजते. मुंबईत आल्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीला सामोरे जाण्यासाठी मी आलो आहे. आत्ताच मी काही बोलणार नाही. मी आता न्यायालयातच बोलेन, असं परमबीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या: