माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे निधन

वेबटीम : बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील आणि धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव गिरधर पाटील (92) यांचे आज (शनिवारी) मुंबईत निधन झाले.मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवाजी पाटील हे शिरपूर साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते.त्यांनी 12 वर्षे महाराष्ट्राचे सहकार मंत्रिपदही भूषविले होते.2013 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
शिवाजी पाटील यांना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता.तरूण वयातच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेले पाटील,स्वातंत्र्यानंतर राजकारणात आले.महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री,आमदार राहिलेले पाटील शिवाजीराव पाटील एक टर्म राज्यसभेचे खासदारही होते.
कॉंग्रेस,समाजवादी पक्ष,बहुजन समाज पार्टी असा राजकीय प्रवास
शिवाजी पाटील यांचा कॉंग्रेस,समाजवादी पक्ष,बहुजन समाज पार्टी असा राजकीय प्रवास राहीला.1960 ते 1967 या काळात ते महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून गेले होते.तर,1967 ते 1980 आसा प्रदीर्घकाळ ते विधानसभेचे आमदार होते.1967,1972 आणि 1978 अशा सलग तीन निवडणूका त्यांनी जिंकल्या होत्या.