माजी आमदार दिलीप माने यांच्या कारला अपघात

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या कारची दुचाकीस्वारास समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शहाजी राऊत (वय55, रा.तांदूळवाडी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तर दिलीप माने आणि त्यांचा चालक किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे आज, मंगळवारी(दि.14)सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती मिळत आहे की,  माजी आमदार माने हे आपल्या कारने म्हसवडकडे देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी तांदुळवाडीनजीक साळमुख रोडवरील स्वामी समर्थ मंगल कार्यालय शेजारी त्यांच्या कारची समोरून येणार्या दुचाकीस जोराची धडक झाली. यात दुचाकीस्वार शहाजी राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मयत राऊत यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. तर माजी आमदार माने यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले