माजी मंत्र्यांनी श्रेयासाठी निरर्थक उठाठेव करू नये

टीम महाराष्ट्र देशा : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परळी पंचायत समितीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. सध्या परळी पंचायत समितीचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. मात्र या पुरस्काराचे श्रेय लाटण्याच्या आरोप समितीच्या सभापती कल्पनाताई सोळंके यांनी मुंडे यांच्यावर केला आहे.

” गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून परळी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारभार सुरु आहे. 12 पैकी 8 सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. तरीही एक पत्रक काढून या पुरस्काराचे श्रेय माजी पालकमंत्री घ्यायची उठाठेव करत असल्याचा आरोप सोळंके यांनी केला आहे.

पंचायत समितीच्या सदस्यांनी योजना व निधी साठी केलेल्या कामाला अनेकवेळा माजी मंत्र्यांनी अडथळे आणले होते. त्यामुळे आमच्या कामाचे श्रेय लाटण्याची उठाठेव करण्याऐवजी त्यांनी प्रत्यक्ष लोकामध्ये जाऊन कामे करावीत, असा खोचक सल्ला उपसभापती पिंटू मुंडे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :