तुळजापुरातील पुजाऱ्यांच्या मदतीसाठी माजी मंत्र्याचा आग्रह

उस्मानाबाद : कोरोनामुळे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांअभावी पुजारी, व्यवसायिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पुजारी बांधवांसह छोट्या व्यावसायिकांना मंदिर संस्थानने मदत करावी, अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे.

जागतिक महामारी कोरोनाचा दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर पुन्हा एकदा भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, भाविकांअभावी शहरातील अर्थकारण ठप्प झाले असून, पुजारी तसेच छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे एक तीर्थक्षेत्र आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने पुजारी तसेच छोट्या व्यावसायिकांना किराणा साहित्याच्या किटसह ईतर जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याची मागणी माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, सहा दिवसांपूर्वीच गरजू पुजारी कुटुंबाला किराणा साहित्य पुरवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. मंदिर संस्थानने तिन्ही पुजारी मंडळांना पत्र पाठवून गरजू पुजारी कुटुंबीयांची माहिती तत्काळ मागवली आहे.

गेल्या वर्षभरापासून लाॅकडाऊन आणि संचारबंदीचा सामना करणाऱ्या पुजारी बांधवांवर मंदिर बंद करण्यात आल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने पुजारी बांधवांना किराणा साहित्य वाटप करण्याची मागणी जोर धरू लागली होती. यानंतर मंदिर संस्थानने तिन्ही पुजारी मंडळाला पत्र पाठवले असून, रेशन साहित्य वाटप करण्यासाठी गरजू पुजारी कुटुंबीयांची माहिती मागवली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP