कॉंग्रेसला धक्का! माजी मुख्यमंत्र्यांसह ११ आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश

कॉंग्रेसला धक्का! माजी मुख्यमंत्र्यांसह ११ आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश

CM Mukul sangma

नवी दिल्ली: मेघालय राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मेघालयचे(Meghalaya) माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा (Former CM Mukul sangma)आणि इतर ११ आमदारांनी कॉंग्रेसला (Congress)सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यासोबत काँग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul gandhi)यांनी माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विंसेट यांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर ही मोठी राजकीय घडामोड पहावयास मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते मुकूल संगमा आणि प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख विंसेट यांची मेघालयच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून यांच्यात बिनसले असल्याची चर्चा होती. पक्षाने विंसेट यांची नियुक्ती करण्याआधी आपल्यासोबत कोणत्याही प्रकारे चर्चा केली नसल्याचंही मुकूल संगमा यांनी म्हटलं होतं.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसच्या वतीने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant kishor)यांच्या टीमचे सदस्य काँग्रेस सदस्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. मात्र संगमा यांनी तृणमूल काँग्रेसला कोणताही शब्द दिला नव्हता. सप्टेंबरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत संगमा यांनी आपण पक्षात राहून नव्याने काम करु असे म्हटले होते. आता त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करत कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

महत्वाच्या बातम्या