पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन

former-mayor-pune-chanchala-kodre-passed-away

पुणे: पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रविवारी रात्री त्रास होवू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना ह्र्दयविकारचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले.

चंचला कोद्रे या राष्ट्रवादी नगरसेवक असून प्रभाग २२ मधून दुसऱ्यांदा निवडून आल्या होत्या. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. महिलांच्या संघटनात त्या कायम अग्रेसर असत. दरम्यान आज संध्याकाळी ६ वाजता मुंढवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोंद्रे यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.