‘या प्रेमाखातरच मी त्यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतली’ ; भाजप आमदाराच्या घरी प्रीयसीचा राडा

bjp-flag-representational-image

टीम महाराष्ट्र देशा : ‘मी त्यांच्यावर प्रेम केलंय, ‘ते माझे पती आहेत. त्यांना भेटायचं आहे, माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी रामदास यांना सोडणार नाही. मी एका चांगल्या घरातील बाई आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. या प्रेमाखातरच मी त्यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतली होती. असा दावा करत कर्नाटकातील भाजप आमदार एस. ए. रामदास यांच्या कार्यालयात गुरुवारी एका महिलेनं जोरदार राडा घातला.

रामदास हे मैसूरच्या कृष्णाराजा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. ते घरातूनच कार्यालयीन कामकाज पाहतात. सूत्रांच्या माहितीनुसार, काल सकाळी साडेआठच्या सुमारास प्रेमकुमारी नावाची महिला त्यांच्या कार्यालयात पोहोचली. तिथं पोहोचताच तिनं रामदास यांच्याबद्दल विचारणा करत हा राडा घातला.

मागील निवडणुकीत प्रेमकुमारीनं त्यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मात्र, नंतर उमेदवारी मागे घेतली. पाच कोटी देऊन तिला माघार घ्यायला लावल्याचे आरोप त्यावेळी रामदास यांच्यावर झाले होते.