माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी याचं निधन

टीम महाराष्ट्र देशा : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती चिंताजनक होती. मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त असलेल्या चॅटर्जी यांना १० ऑगस्टला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र उपचारादरम्यान त्याचं आज 8 च्या सुमारास निधन झालं. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

याच वर्षी जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्ष २०१४ मध्येही त्यांना असाच त्रास जाणवला होता.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. संसदीय प्रणालीतील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले आहे. १४ व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र आहेत.

‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्या- संभाजी भिडे गुरुजी

हृतिकनं भरला 80कोटींचा आयकर

Gadgil