माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती चिंताजनक

टीम महाराष्ट्र देशा – माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त असलेल्या चॅटर्जी यांना १० ऑगस्टला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

याच वर्षी जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्ष २०१४ मध्येही त्यांना असाच त्रास जाणवला होता.

Rohan Deshmukh

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. संसदीय प्रणालीतील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले आहे. १४ व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र आहेत.

मनी लाँड्रिंग प्रकरणात भुजबळांना दिलासा; ६ सप्टेंबरपर्यंत अटक नाही

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...