धोनी मुंबईकर होणार, मुंबईत घेतले चार फ्लॅट

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वॄत्तानुसार, धोनी अंधेरीतील ज्या सोसायटीत घर घेतले त्या सोसायटीच्या जीममध्ये जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत आहे. इतकेच नाहीतर स्थानिक दलाल देखील ग्राहकांना फ्लॅट्स दाखवताना सोसायटीचा उल्लेख ‘धोनीची बिल्डिंग’ असा करत असल्याचीही माहिती ‘मिरर’ने दिली आहे. या सोसायटीच्या जवळच बॉलीवूड सेलिब्रिटी विपूल शहा, चित्रांगधा सेन, प्राची देसाई आणि प्रभू देवा यांचे फ्लॅट्स आहेत.

गेल्याच आठवड्यात धोनीने भारतीय संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. मात्र तो एक खेळाडू म्हणून खेळत राहणार आहे. तर पुणे आयपीएल टीमचाही तो कर्णधार असणार आहे. येत्या १५ जानेवारी रोजी भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना पुण्यात खेळविण्यात येणार असून विराट कोहली संघाचे नेतृत्त्व करणार आहे. धोनी देखील या सामन्यात असणार आहे.