fbpx

भारतीय टीमचा धडाकेबाज माजी सलामीवीर गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. भारतीय टीमचा धडाकेबाज माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप गौतम गंभीरला दिल्लीमधून लोकसभेची उमेदवारी देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धडाकेबाज फलंदाजीसाठी गंभीरला ओळखले जायचे.क्रिकेटमध्ये नशीब आजमावल्या नंतर आता गंभीर राजकारणात नशीब अजमावणार आहे. गंभीरला भाजपकडून नवी दिल्लीमधून मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी सुरु आहे. खासदार मीनाक्षी लेखी यांच्या जागी गौतम गंभीरला उमेदवारी मिळू शकते असा अंदाज लावला जात आहे .

दरम्यान, गंभीरचा सलामीचा जोडीदार वीरेंद्र सेहवागला देखील भाजपकडून हरियाणाच्या रोहतकमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.