जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मलहोत्रा यांचे निधन

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरच्या विभाजनाआधी राज्यपाल राहिलेले जगमोहन मलहोत्रा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते १९९० च्या काळात जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मलहोत्रा यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

जगमोहन मलहोत्रा यांचा जन्म १९२७ मध्ये सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या हाफिजाबादमध्ये झाला होता. त्यांनी केंद्रीय मंत्री, दिल्लीचे राज्यपाल, अविभाजीत जम्मू-कश्मीरचे राज्यपाल, गोवा तसेच दमन आणि दीवचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. दिल्लीमध्ये त्यांनी केलेली सौदर्यीकरणाची कामे आजही लोकांच्या लक्षात आहेत.

त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद मोदी संवेदना व्यक्त केल्या आहेत. मोदी म्हणाले की, ‘ते खुपच चांगले प्रशासक आणि प्रसिद्ध विद्वान होते, त्यांनी कायमच भारताच्या भल्यासाठी काम केले. ते मंत्री असताना अनेक धोरणे आखण्यात आली आहेत.’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही त्यांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या