‘स्वातंत्र्याच्या ७ दशकांनंतर पहिल्यांदा उत्तर प्रदेशला त्यांचे हक्क मिळाले’

‘स्वातंत्र्याच्या ७ दशकांनंतर पहिल्यांदा उत्तर प्रदेशला त्यांचे हक्क मिळाले’

नरेंद्र मोदी

उत्तर प्रदेश : उत्तरप्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमातळ असलेले देशातील पहिले राज्य ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरच्या जेवार येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (२५ नोव्हें) रोजी दुपारी 1 वाजता उत्तर भूमीपूजनसाठी उपस्थित राहिले आहेत.
या कार्यक्रमात बोलताना नरेन्द्र मोदी यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७ दशकं उत्तर प्रदेशला ज्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या नाही त्या आज मिळत आहेत, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी भाजपा सरकारने केलेल्या कामांविषयी माहिती दिली.

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या ७ दशकांनंतर पहिल्यांदा उत्तर प्रदेशला त्यांचा हक्क असलेल्या गोष्टी मिळत आहे. डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नाने आज उत्तर प्रदेश देशातील सर्वात कनेक्टेड प्रदेशात रुपांतरीत होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये देखील लाखो कोटी रुपयांच्या प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे’, असे देखील ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर इतके वर्षे उत्तर प्रदेशला टोमणे ऐकण्याची परिस्थिती तयार करण्यात आली. आधीच्या सरकारने उत्तर प्रदेशला कमतरता आणि अंधारात ठेवलं. त्या सरकारांनी उत्तर प्रदेशला विकासाची खोटी स्वप्न दाखवली. आज हाच उत्तर प्रदेश राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे, असे म्हणत कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश मधील विमानतळ हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे विमानतळ असेल, असा योगी सरकारचा दावा आहे. विशेष म्हणजे विमानतळाला प्रस्तावित दिल्ली-वाराणसी हायस्पीड रेल्वेने जोडण्याची योजना आहे, ज्यामुळे दिल्ली आणि विमानतळादरम्यानचा प्रवासाचा वेळ 21 मिनिटांपर्यंत कमी होईल. एवढेच नाही तर जवळपासचे सर्व प्रमुख मार्ग आणि महामार्ग जसे की यमुना एक्सप्रेसवे, वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि इतर देखील विमानतळाशी जोडले जातील.

महत्त्वाच्या बातम्या