गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश!

sitaram

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. माजी आमदार सीताराम घनदाट यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला परभणीमध्ये एक नवीन चेहरा मिळाला आहे. सीताराम घनदाट हे मूळ पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथील रहिवासी आहे.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गळती लागली होती. राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडून दुसऱ्या पक्षांत सामील झाले होते. परंतु राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत पुनरागमन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. सिताराम घनदाट हे पारनेर तालुक्यातील भुमिपूत्र आहेत. अभ्युदय बँकेत त्यांनी पारनेर तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या लावल्या आहेत. त्यांच्या आजच्या प्रवेशाने पारनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढणार आहे.

सिताराम घनदाट यांनी अभ्युदय बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळविला आहे. सीताराम घनदाट यांच्या पक्षप्रवेशाने परभणी जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढणार आहे.

महत्वाच्या बातम्या:-