बिडकीनमध्ये माजी उपसरपंचाची हत्या, आरोपींना ठोकल्या १२ तासात बेड्या

औरंगाबाद : गाढेगाव (ता.पैठण) शिवारात सोमवारी (दि़३) सकाळी सहाच्या सुमारास
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतीच्या वातदातून माजी सरपंच कांती श्रीपती शिंदे (वय ४८) यांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. तातडीने तपासचक्र फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा तासाच्या आत तीन आरोपींना जेरबंद केले.

बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गाढेगाव शिवारात कांता शिंदे यांचे शेत आहे. गेल्या काही वर्षांपासून या शेतीच्या वादातून शिंदे आणि राजेश प्रभाकर केदारे (२३) यांच्यात वाद होता. रविवारी कांता शिंदे हे शेतातातून पतर घराकडे येत असतांना त्यांना ब्रम्हगव्हाण पंप हाऊस रोडवरील म्हसोबा पुलाजवळ अडवून राजेश केदारे, अनिल उर्फ पप्पु अशोक केदारे (वय २१) आणि संजय मनोहर केदारे (वय २६)  या तिघांनी कमरेच्या बेल्टने, लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्याने मारहाण करुन त्यांची हत्या केली़.

या घटनेनंतर आरोपी पासार झाले, दुसऱ्या दिवशी कांता शिंदे यांचा मृतदेह एका लिंबाच्या झाडा खाली आढळून आला होता. मात्र, खून करणारे कोण आहेत याचा मागमूस लागत नसल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. १२ तासात पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या.

महत्त्वाच्या बातम्या