fbpx

कामगारांचा बुलंद आजवा कालवश, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

George-fernandes

दिल्ली : कामगारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे माजी संरक्षण रजॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस यांनी आपले संपूर्ण जीवन कामगारांच्या कल्याणासाठी घालवले. मुंबईतील एकेकाळचे बंदसम्राट म्हणून फर्नांडिस यांची ओळख होती.

३ जून १९३० मध्ये जन्मलेले जॉर्ज फर्नांडीस यांचे तब्बल दहा भाषांवर प्रभुत्व होते. हा भावांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे सर्वात मोठे होते. मुंबईत आल्यावर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले. रेल्वे कामगारांनी पुकारलेल्या ८ मे १९७४ च्या आंदोलनामुळे जॉर्ज फर्नांडिस यांना लढवय्या कामगार नेता अशी ओळख मिळाली.

जॉर्ज फर्नांडीस यांची आई किंग जॉर्ज ( पाचवा ) यांची प्रशंसक होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या सहा मुलांतील सर्वात मोठ्या मुलाचे नाव जॉर्ज असे ठेवले. फर्नांडीस यांनी मुंबईत आल्यावर आपल्या करीयरची सुरुवात एका दैनिकामध्ये प्रुफ रीडर म्हणून केली. पुढे ते सोशलिस्ट पार्टी और ट्रेड यूनियनच्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊ लागले. या आंदोलनांमुळे ते कामगारांचे नेते बनले.

1967 ते 2004 पर्यंत फर्नांडिस 9 वेळा लोकसभा खासदार राहिले. ते 1998-2004 या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात देशाचे संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत होते. फर्नांडिस यांनी देशाच्या रेल्वे, दूरसंचार, उद्योग खात्यांच्या मंत्रीपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.