सुरेश रैनाच्या ‘त्या’ वक्तव्याला माजी क्रिकेटपटु किर्ती आझाद यांचा पाठिंबा

मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना तामिळनाडू प्रीमियर लीगच्या (टीएनपीएल) पाचव्या मोसमातील सामन्यात समालोचन करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. या दरम्यान त्याला एक प्रश्न विचारला गेला होता.त्या प्रश्नाला उत्तर देताना रैनाने स्वत: ला ब्राह्मण म्हटले. त्याच्या याच वक्तव्यामुळे सोशल मीडियावर राग व्यक्त केला जात आहे.

या वक्तव्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. यावर भारताचे माजी क्रिकेटपटु किर्ती आझाद यांनी पाठिंबा दर्शवला आहे. २१ जुलै रोजी रात्री त्यांनी ‘ #मैं_भी_ब्राह्मण हूँ….आपत्ति कैसी भाई?????’ असे ट्विट करत सुरेश रैनाला ट्रोल करणाऱ्याना धारेवर धरले आहे. सुरेश रैनाच्या त्या वक्तव्यामुळे सोशल मीडीयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक चाहते त्याच्या समर्थनार्थ उतरले आहेत तर काही त्याच्या विरोधात प्रतिक्रिया उमटत आहे.

गेल्या आठ वर्षापासुन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत आहे. ब्राम्हण असल्यामुळे चेन्नईची संस्कृती स्वीकारायला सोपं गेलं असे सुरेश रैना म्हणाला. यावर एका चाहत्याने त्याला इतकी वर्ष चेन्नईकडून खेळला तरीही येथील संस्कृतीचा अनुभव नाही अशी प्रतिक्रिया दिली. गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी सुरेश रैनाने त्याचा सहकारी महेंद्रसिंह धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती स्विकारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP