कोरोनाच्या लढ्यात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केला मदतीचा एक हात पुढे

दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक शहरात अपुऱ्या औषधापोटी आणि ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. या संकटाच्या काळात अनेक क्षेत्रातुन मान्यवर व्यक्ती पुढे आल्या आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोनाच्या या लढ्यात आता भारताचा माजी क्रिकेटपटु गौतम गंभीरचे नावही जोडले गेले आहे. देशभरात सध्या ऑक्सिजनची सध्या नितांत गरज भासत आहे. या परिस्थीतीला तोंड देण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करण्यामागे आरोग्य यंत्रणेचा मोठा कल दिसतोय. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची देखील आवश्यकता आहे, हे ओळखुन गंभीरने २०० ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्सची मदत केली आहे. स्वत: च्या अधिकृत अंकाउटवरुन ट्विट करुण गंभीरने ही माहिती दिली आहे. हे ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स दिल्लीतील गरजवंताना दिले जाणार आहे.

याआधी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स व ब्रेट ली यांनी भारताला आर्थिक निधी देवून मदत केली आहे. तर भारताचा महान फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी १ कोटी रुपयांची मदत केली होती. भरताचा माजी क्रिकेटपटू व वर्तमान बिजेपी खासदार गौतम गंभीर यांनी देखील कोरोना काळात मदत करत आपला खारीचा वाटा उचलला आहे.

महत्वाच्या बातम्या