fbpx

अडीचशे- तीनशे दहशतवादी मारल्याचं म्हणत भाजपाध्यक्ष अकलेचे तारे तोडत आहेत – चव्हाण

पुणे: भारतीय वायुदलकडून बालकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकला सर्व विरोधकांनी सरकारला पाठिंबा दिला. तर पंतप्रधान मोदी भाजपचा प्रचार करत होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांत एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अनेक लोक आता प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. हवाई दलाकडून अधिकृत माहिती आलेली नाही, तरीही भाजप अध्यक्ष अमित शहा अडीचशे- तीनशे दहशतवादी मारले म्हणत अकलेचे तारे तोडत असल्याचा टोलाही यावेळी चव्हाण यांनी लगावला आहे.

भारताकडे राफेल असते तर पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई चकमकीचा निकाल वेगळा लागला असता असे पंतप्रधान मोदीच म्हणत आहेत. पंतप्रधानांचे हे विधान नजरचुकीने नाही तर राजकीय हेतूने करण्यात आले आहे. हे भारतीय सैन्याचे मनोबल कमी करणारे वक्तव्य आहे, त्यामुळे त्यांनी सैन्याची माफी मागावी, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

बालकोटमध्ये नेमकं काय झालं हे सांगायला कोणी तयार नाही, वायुदलाने देखील आमच्यावर सोपवण्यात आलेली कारवाई आम्ही केल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. संबंधित ठिकाणची सर्व माहिती गोळा करण्याचे काम गुप्तचर यंत्रणा म्हणजेच रॉचे आहे. त्यामुळे याची जबाबदारी घेत पंतप्रधान मोदी अथवा संरक्षण मंत्रालयाने चौकशी करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.

1 Comment

Click here to post a comment