एकामागे एका खेळाडूंच्या दुखापतीनंतर माजी फलंदाज सेहवागची बीसीसीआयला ऑफर !

वीरेंद्र सहवाग

नवी दिल्ली: भारतीय संघातील अर्धाहून अधिक खेळाडूंना दुखापती झाल्या असून रोज यात नवीन भर पडत आहे. एका पाठोपाठ टीम इंडियाला धक्का बसत आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजा यापूर्वीच या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यातच आता अजून एक फलंदाज ब्रिस्बेन कसोटी सामन्याला मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सिडनी कसोटी सामन्यात हनुमा विहारी मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही, तसेच आगामी इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येदेखील विहारी खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता सराव सुरू असताना मयंक अगरवाल यालाही दुखापत झाली आहे.

बॉलर मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि बल्लेबाज लोकेश राहुल दुखापत ग्रस्त असल्याने आता कोच रवि शास्त्री आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे यांच्या समोर ११ फिट खेळाडू एकत्र आणण्याच आव्हान निर्माण झाल आहे. या पार्शभूमीवर भारताचा माजी फलंदाज सेहवागने बीसीसीआयला ऑफर दिली आहे. यावेळी त्याने भारताचे ६ खेळाडू दुखापत ग्रस्त असल्याने आपण ऑस्ट्रेलियाला जाण्यास तयार असल्याच म्हटलं आहे.

वीरेंद्र सहवाग ने आपल्या ट्वीट मध्ये ६ खेळाडूंचे फोटो देत. म्हटल कि, ‘हे सहा जण दुखापतग्रस्त असून जर ११ खेळाडू नसतील तर मी ऑस्ट्रेलियाला जाण्यास तयार आहे. क्वारंनटाईनच बघून घेता येईल’. अस देखील यावेळी सेहवाग म्हटलं. तर बीसीसीआयला टैग केल आहे.

महत्वाच्या बातम्या