मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या आवृत्तीसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत संपत आली आहे आणि म्हणूनच सर्व फ्रँचायझी त्यांच्या संबंधित खेळाडूंची यादी जाहीर करत आहेत. चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवण्याच्या बातम्या समोर येत आहेत. चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीशिवाय ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा यांना कायम ठेवले आहे. मोईन अलीलाही आणल्याची चर्चा आहे, तो आला नाही तर सॅम करणला कायम ठेवण्यात येईल. मात्र आता धोनीला संघात कायम ठेवल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रॅड हॉगने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज ने त्यांचा कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवल्याच्या निर्णयावर प्रोफेशनली विचार करायला हवा, असे ब्रॅड हॉगने म्हटले आहे. धोनी एक वर्षापेक्षा जास्त काळ खेळला नाही तर त्याला कायम ठेवणे योग्य नसल्याचे हॉगने म्हटले आहे.
एमएस धोनीला किती दिवस खेळायचे आहे? जर तो आणखी एक वर्ष खेळला, तर त्याला निवडणे योग्य होणार नाही. मी त्याला लिलावात जाऊ देईन आणि तिथून पुन्हा त्याला विकत घेईन. हे खूप अवघड आहे पण व्यवसायात असेच होते. फक्त एक वर्ष खेळणार असलेल्या खेळाडूवर तुम्हाला १५ टक्के खर्च करायचा आहे का? असा सवालही ब्रॅड हॉगने केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- शाळा सुरु करण्याबाबत होणार पुन्हा चर्चा, आरोग्यमंत्र्यांची माहिती
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<