माजी सेना प्रमुख दलबीर सिंग सुहाग भाजपच्या वाटेवर ?

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे: माजी सेना प्रमुख दलबीर सिंग सुहाग भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असून, येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

भाजपचे  राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर सुहाग यांची भेट झाली आहे. त्यामुळे या प्रवेशाची शक्यता असून माजी सेना प्रमुख आणि परराष्ट्र राज्य मंत्री वी.के.सिंह यांनी जसा २०१२ साली निवृत्त झाल्यावर भाजपा प्रवेश केला व २०१४ साली लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला व मंत्री बनले तसेच सुहाग सुद्धा करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपाच्या समर्थन अभियानात भाजपाचे  नेते भारतामधील  प्रमुख  व्यक्तींना भेटत असून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, याच अनुषंगाने भाजपा अध्यक्ष शहा व माजी सेना प्रमुख सुहाग यांचीही भेट झाली त्याचे फोटो प्रसार माध्यमातून झळकल्यावर या शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

You might also like
Comments
Loading...