आंध्रप्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांनी केली आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा:-तेलुगू देशम पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव (वय ७२) यांनी गळफास घेऊन आत्म्हत्या केल्याचे समोर आले आहे. हैदराबादमधील आपल्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. कोडेला शिव प्रसाद राव हे राज्यातील विरोधी पक्ष तेलुगू देशम चे सर्वात जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. राव यांच्यावर विधानसभेची संपत्ती चोरी केल्याच्या आरोप होता.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राव यांना बसवतारकम रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी ते मृत असल्याचे घोषित केले. त्यांच्या कुटुंबात पत्नी शशिकला, कन्या डॉ. विजया लक्ष्मी आणि दोन मुले डॉ. शिव राम कृष्ण आणि डॉ. सत्यनारायण आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या मृत्यूवर दुखः व्यक्त केले आहे.

कोडेला हे सहा वेळा खासदार होते. विभाजनानंतर ते आंध्र प्रदेशचे पहिले विधानसभा अध्यक्ष झाले होते. ते १९८५ मध्ये माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या कॅबिनेटमध्ये गृहमंत्रीही होते. चंद्राबाबू नायडू यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी अनेक मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली होती.