परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला? ‘या’ निवृत्त अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला? ‘या’ निवृत्त अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Parambir Singh

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांच्यावर आता नवीन आरोप करण्यात आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh)यांच्यावरील आरोपांनंतर बेपत्ता असलेल्या परमबीर सिंह यांना कोर्टाने फरार घोषित केलं आहे. मात्र त्यातच आता मुंबईमधील निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती असा गंभीर आरोप करत खळबळ माजवली आहे.

शमशेर पठाण (shamsher pathan)यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना (mumbai police commissioner)पत्र लिहिलं असून याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा (ajmal kasab)मोबाईल लपवला होती अशी शंकाही व्यक्त केली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता असं त्यांनी पत्रात म्हटले आहे.

परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा शमशेर पठाण यांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळे आता हे नवीन प्रकरण समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या