शेतकऱ्यांचे १०० टक्के माफ करा, या सभापती महोदयांनी धाडले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र  

goregaon

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा आकांशित, अतिमागास, वनव्याप्त, नक्षलग्रस्त भाग आहे. या जिल्ह्यात कोणतेही धरण नसून येथील शेतकरी निसर्गाच्या भरवशावर शेतीचे पीक घेतात. मात्र मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी गोसेखुर्द धरणात सोडल्याने गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. यामुळे वैनंगा व जिल्ह्यातील उपनद्यांना पूर आलाच पण नद्या लगतच्या शेतात ५ ते ६ दिवस पाणी साचून राहिल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. हा फटका बसलेल्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे १00 टक्के कर्ज माफ करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी चामोर्शी (कृउबास) कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

हा पूर मानवनिर्मित असल्याने रातोरात पाणी वाढल्यामुळे शेतकर्‍यांना कुठलीही काळजी घेता आली नाही. त्यामुळे शेतामध्ये असलेले डिसेल व इलेक्ट्रीक पाण्याचे पंप, पाईप वाहून गेले. शेतात कामाकरिता असलेली इतर अवजारे सुद्धा पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहते व त्यांना जोडलेल्या उपनद्या, नाले वाहतात त्याच्या आजुबालुला असलेल्या हजारो शेतकर्‍यांचा करोडो रूपयांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहेत. शेतकर्‍यांनी घेतलेले बॅंक, सोसायटी, सावकार, बचतगटाकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार, दुसर्‍यांदा जमीन कसून पीक घेण्यासाठी लागणारे पैसे कुठुन आणार असे अनेक प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहेत.

शेतकर्‍यांना स्वाभीमानोन जगण्याकरिता पुरपीडित शेतकर्‍यांचे १00 टक्के कर्ज माफ करून पुढील काम करण्याकरिता भाताला एकरी ३0 हजार, कापसाला एकरी ५0 हजार व इतर पिकांना एकरी ४0 रूपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-