आमदार खासदार नगरसेवक सोडा किमान पेंग्वीनी तरी ‘मातोश्रीवर’ जायला पाहिजे होत – नितेश राणे

udhav thakrey

वेबटीम : एक काळ होता की गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी रीघ असायची, गुरुपौर्णिमेला सकाळीपासून ते रात्रीपर्यंत मातोश्रीच्या परिसराला जत्रेच स्वरूप आलेलं दिसून येत असे. सध्या शिवसेना सत्तेत आहे. या सत्ताकाळात अनेक नेत्यांना सरकारमध्ये मंत्रिपद मिळाली आहेत. मात्र, आज गुरुपौर्णिमा असताना देखील मातोश्रीवर एकही नेत्याने भेट दिली नसल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. या बाबद शिवसेनेसह राजकीऊ क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे.

कोणत्याही घटनेवरून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी न सोडणारे आमदार नितेश राणे यांनी गुरुपौर्णिमेला कोणत्याच नेत्याने मातोश्रीवर जाण्याची तसदी घेतली नसल्याच्या कारणावरून उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल आहे की “आमदार, खासदार नगरसेवक सोडा किमान त्या पेंग्वीननी तरी मातोश्रीवर आपल्या गुरुला जाउन भेटण गरजेच होतं खुप लाड झाले त्यांचे”