अंतर्गत वाद विसरून कामाला लागा : उद्धव ठाकरे

udhav thakrey

आपापसात असणारे हेवेदावे विसरून कामाला लागण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे हेवेदावे नसून कुठलाच वाद नसल्याच सांगत उद्धव यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत सुरु असणाऱ्या कलहाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना भवनात राज्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात सध्या कर्जमाफीचे वारे राज्यात कर्जमुक्तीचे वातावरण घोंगावत असून प्रत्यक्षात कर्जमुक्ती झालेली नाही. कर्जमुक्ती ही सत्यावर आधारित असावी असे मत त्यांनी मांडले आहे. तसेच कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांची आकडेवारी विधानसभेत मांडण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.