जंगल निर्माण शक्य नाही मात्र, वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते- आमदार निंलगेकर

sambhaji

देवणी : पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे मत भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केलय. धनेगांव तालुका देवणी येथे आमदार निंलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने भाजपच्या युवामोर्चा तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे यांनी धनेगांव येथील स्मशानभुमी परिसरात वृक्षलागवड सप्ताहाचे आयोजन करुन १५०० देशी वृक्षाची लागवड केली, ही पाहणी करण्यासाठी आमदार संभाजीराव पाटील निंलगेकर आले होते. यावेळी ते बोलत होते.

वृक्षांची लागवड करून उपयोग नसून, त्यांचे संगोपन होणे गरजेचे आहे. याकरिता सामाजिक संस्था लोकसहभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संगोपन ही चळवळ उभी केली पाहिजे, रामलिंग शेरे वृक्षलागवड व सर्वधनासाठी गेली पाच वर्षे झाले कार्य करतात त्याचे कार्ये कौतुकास्पद असल्याचे आमदार निलंगेकर म्हणाले.

वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहेच, पण त्याच बरोबर त्याचे संगोपन करणेही महत्त्वसाचे असून त्या माध्यमातून आपण पर्यावरणाचा समतोल साध्य करु शकतो असे मत आमदार निलंगेकर यांनी व्यक्त केले.  या वेळी तहसिलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सभापती सविता पाटील आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या