घोरपडींची अवैध विक्री करणाऱ्या इसमाला सोलापुरात अटक

राज्यात वन्यप्राण्यांची तस्करी तसेच विक्री सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे . सोलापुरात घोरपडी ची अवैधरित्या होत असलेल्या विक्रीचा भांडाफोड नेचर कॉन्झर्वेशन सर्कल या संघटनेच्या दक्षतेमुळे उघड झालाआहे.
   काल रात्री सोलापुरातील कुंच्ची कोरवी झोपडपट्टी येथील बाळू मलेदार (वय 28) याच्या घरात घोरपडीचे मटण विक्री तसेच जिवंत घोरपडींची विक्री होत असल्याची माहिती  एका वन्यजीव प्रेमी कडून  नेचर कॉन्झर्वेशन सर्कल या संघटनेला मिळाली  . माहिती मिळताच NCCS चे प्रमुख भरत छेडा यांच्या मार्गदर्शनाखाली पप्पू जमादार,श्रीकांत व मोहसीन बेसकर, यांना तोतया गिऱ्हाईक म्हणून घोरपड विकत घेण्यासाठी  पाठवण्यात आले . ३ जिवंत  घोरपडी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विक्री करणाऱ्या व्यक्तीने त्यांना त्यांना सांगितले . एक घोरपडीचा  भाव अडीच हजार रुपये असल्याचे विक्रेत्याने सांगितले .शेवटी २२०० रुपयांमध्ये व्यवहार ठरला. अगोदर २०० रुपये ॲडवांस देतो व बाकीचे रुपये एका तासाने घेऊन आल्यावर घोरपड दतोे असे सांगून जमादार आणि त्यांचे सहकारी त्याठिकाणावरून निघाले .ताबडतोब या घटनेची माहिती वन विभागाला दिली त्यानंतर वन विभागाने घोरपड देत असताना  आरोपी बाळू मलेदार  त्याला रंगे हात पकडले .