परदेशी आयात कांदा विकू देणार नाही, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

maratha-kranti-morcha-

टीम महाराष्ट्र देशा : कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच परदेशातून कांदा आयात केला जात आहे. त्यामुळे आयात केलेला कांदा जेएनपिटी बंदरात उतरवू देणार नाही. राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरू आणि आयात केलेला कांदा विकू देणार नाही,’ असं म्हणत मराठा क्रांती मोर्चाने कांदा प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यात कांद्याचे भाव प्रचंड वाढले आहे. तसेच शेतमाल आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. अशातच सरकार कांदा आयात करणार आहे. 15 दिवसात कांदा आयात केला जाईल आणि त्याच दरम्यान आपल्या शेतातील कांदा बाजारात येणार आहे. यामुळे भाव घसरले तर शेतकऱ्याचं नुकसान होईल,’ असं म्हणत सरकारकडून होणाऱ्या कांदा आयात निर्णयाविरोधात मराठा समाजाने तीव्र विरोध केला आहे.

दरम्यान, जानेवारीत परदेशी कांदा आणि शेतकऱ्यांच्या कांदा एकाच वेळी बाजारात आल्यास भाव कोण देणार? राज्यात नवे कांदा उत्पादन येणार असताना सरकार कांदा आयात का करू पाहते? सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा शेतकऱ्याच्या आर्थिक संकटात वाढ होणार आहे. त्यामुळे परदेशी आयात कांदा विकू देणार नाही,’ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे.

देशभरातल्या अतिवृष्टीनं खरीप कांद्याचं मोठं नुकसान झालंय तर रब्बी कांद्याचा साठा संपत आलाय. कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात यायला आणखी 3 महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे कांदा आयात करुन देशातली गरज पूर्ण होणार नाही अशी माहिती कांदा बाजाराचे विश्लेषक दिपक चव्हाण यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :