मुलींना शालेय शिक्षणात ‘सेल्फ डिफेन्स’ विषय सक्तीचा करा : आकांक्षा चौगुले

पुणे :  गेल्या आठवड्यात हिंगणघाट येथे महिला प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून जाळण्यात आले. तसेच सिल्लोड आणि मुंबई येथे महिलांवर झालेल्या अत्याचारा बद्दल ILS law कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

विद्यार्थीनी आकांक्षा चौगुले हिने बोलताना सांगितले की, आज जे अत्याचार मुलींवर होत आहेत. याचे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवावे व त्यातून पीडित महिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारने करावा. तसेच सरकारकडे काही मागण्याही ही करण्यात आल्या त्यात मुलींना शालेय शिक्षण घेत असताना त्यांना सेल्फ डिफेन्स सक्तीचं करा. जेणे करून त्यांना त्यांचे स्वसंरक्षण करता यईल, असे आकांक्षा चौगुले आणि मानसी डागा यांनी यावेळी पत्रकरांशी बोलताना सांगितले.

या निषेध सभेसाठी कर्मचारी युनियनचे अध्यक्षा मुक्ता मनोहर याही उपस्थित होत्या. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज मुलींनीच इतर मुलींच्या न्याय हक्कासाठी कुठेतरी रस्त्यावर उतरून सरकारकडे न्यायाची भिक मागण्याची गरज आहे, असे सांगितले.