रणबीर, रणवीर ला मागे टाकत दीपिका फोर्ब्स यादीत अव्वल

वेबटीम- फोर्ब्सने बॉलीवूड मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या  कलाकारांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये पहिल्या स्थानावर दरवर्षी प्रमाणे शाहरूख खान असून शाहरूख खानने त्यांच्या सर्व जाहिराती व चित्रपटातून २४६ करोड रुपये कमावले आहेत. दुसऱ्या स्थानावर सलमान खान असून सलमान खानने २३६ करोड रुपयांची कमाई केली आहे. तिसऱ्या स्थानावर अक्षयकुमार असून अक्षयने २२४ करोड रुपये कमावले आहेत.अभिनेता आमीर खान  चौथ्या क्रमांकावर असून आमीरने ८० करोड रुपये कमावले आहेत.

पाचव्या क्रमांकावर हतिक रोशन असून ७३ कोटी रुपये कमावले आहेत तर सहाव्या स्थानावर दीपिका पादुकोण असून ७० कोटी कमावत बॉलीवूड मधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.सातव्या व आठव्या क्रमांकावर अनुक्रमे रणवीर सिंग व प्रियांका चोप्रा असून नवव्या क्रमांकावर बिग बी अमिताभ बच्चन तर दहाव्या क्रमांक रणबीर कपूर आहे.