फोर्ब्स मॅगझीनच्या श्रीमंताच्या यादीतील ‘या’ उद्योजकाचा चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

mutthu swami

नवी दिल्ली : गेल्या वर्षी फोर्ब्स मॅगझीनमध्ये झळकलेल्या श्रीमंतांच्या यादीत ज्या सहा मल्याळी लोकांचा समावेश होता, त्यामधील एक मुत्थूट ग्रुपचे चेअरमन एमजी जॉर्ज मुथ्थूट यांचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. एमजी जॉर्ज मुथ्थूट हे दिल्ली मध्ये ईस्ट ऑफ कैलास येथे राहत होते. ७१ वर्षीय एमजी जॉर्ज मुथ्थूट हे आजारी सुद्धा होते.

मुथ्थूट ग्रुपने एमजी जॉर्ज मुथ्थूट यांच्या नेतृत्वात जगभरात पाच हजारहून अधिक शाखांचा विस्तार केला आहे. तसेच जॉर्ज मुथ्थूट यांनी २० पेक्षा अधिक वेगवेगळ्या व्यवसायात मुथ्थूट ग्रुप विस्तार केला आहे. सद्यस्थितीत गोल्ड लोन नॉन-बँकिंग फायनान्समध्ये मुथ्थूट फायनान्स ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. महत्वाची बाब म्हणजे मुथ्थूट कंपनी भारतातील सर्वात मोठी नॉन बँकिंग फायनान्सिंग कंपनी आहे. तसेच, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही होते.

एमजी जॉर्ज मुथ्थूट हे शनिवारी रात्री नऊ वाजता दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलासमधील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले. यानंतर स्थानीकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एमजी जॉर्ज मुथ्थूट आपल्या कुटुंबीयातील तिसऱ्या पिढीतील सदस्य होते. त्यांनी मुथ्थूट ग्रुपचे चेअरमन पद सांभाळले होते. त्याचबरोबर, ते चे ट्रस्टी सुद्धा होते. याशिवाय, एमजी जॉर्ज मुथ्थूट हे फिक्की केरळ राज्य परिषदेचे अध्यक्षही होते.

महत्वाच्या बातम्या