fbpx

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पोलीसदीदी’

maharashta-police logo

औरंगाबाद प्रतिनिधी ; शहरातील महिला आणि तरुणीच्या सुरक्षेसाठी आता शहर पोलिसांच्या वतीने 17 पोलीस ठाण्यात पोलीसदीदी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पाथकामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळणार आहे

आज पासून शहरात 17 पोलीस स्टेशन मध्ये पोलीस दीदी नावाने महिला सुरक्षेसाठी पथके सुरू केली आहेत. पोलीस म्हटलं की सर्व सामान्यांच्या मनात भीती निर्माण होत असते आणि भीती निर्माण होणे म्हणजे पोलिसांबद्दल अप्रत्यक्षरीत्या तो अविश्वासच असतो. ही भीती कमी व्हावी तसेच महिला पोलीस कर्मचारी सर्वसामान्य मुलींना महिलांना आपल्या बहिणी प्रमाणे वाटाव्यात म्हणून या पथकाला पोलीस दीदी असे नाव दिले आहे. यासंबंधी पोलीस उपायुक्त दीपाली घाटगे यांनी महिलांच्या व तरुणींच्या समस्येवर उपाययोजना करता यावी म्हणून बैठक बोलावली होती, या बैठकीत प्रामुख्याने नोकरदार महिला सर्वसामान्य महिला आणि महाविद्यालयीन तरुणींनी यासर्वांना  डोळ्यासमोर ठेवून चर्चा करण्यात आली आणि नंतर या पथकाची स्थापनाकरण्यात आली .

सामान्यतः मुली त्यांच्या समस्या किंवा काही त्रास होत असल्यास पोलिसांना सांगायला घाबरतात शिवाय पोलिसांची भीती देखील काही महिलांना वाटते हीच भीती दूर व्हावी त्यांना विश्वासात घेऊन अडचणी दूर करण्यासाठी पोलीस दीदी पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिवाय या पथकाला दामिनी पथकाची जोड राहणार आहे शहरातील महिला व मुलींसाठी हे पथक असून अडचणी असल्यास महिलांनी थेट या पथकाशी निःसंकोचपणे संपर्क साधावा .हे पथक शहरातील विविध ठिकाणी नियमित गस्त घालणार आहे अशी माहिती पोलीस उपयुक्त  दीपाली घाटगे यांनी दिली