…या कारणामुळे सोयरेधायऱ्यांंनी ठेवले शिवसेनेला सत्तेपासून दूर

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर मध्ये जनमत हे शिवसेनेच्या बाजूने असताना देखील महापालिकेवर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजप ची सत्ता आली. त्यामुळे शिवसेनेला सत्ते पासून वंचित राहावे लागले. भाजप – राष्ट्रवादी ही अभद्र युती शिवसेनेला सत्ते पासून वंचित ठेवण्यासाठी नव्हती तर त्याचा पाठीमागे केडगाव हत्याकांडातली आरोपींची नावे झाकण्याचा डाव आहे असा खुलासा अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

राठोड म्हणाले की , पुर्वीची भाजप राहिलेली नाही. अभद्र आघाडी करून पैशाचा वापर करत भाजपने सत्ता मिळवली. ही आघाडी करताना केडगाव हत्याकांडात ज्यांची नावे आली आहेत त्यांची यातून सुटका व्हावी याच उद्देशाने हे सोयरेधायरे एकत्र आले. त्यातूनच राष्ट्रवादीने भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असा आरोप त्यांनी केला.

निवडणुकी मध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 24 नगरसेवक निवडून आले म्हणजेच जनमत हे शिवसेनेच्या बाजूने होते. पण शिवसेना सत्तेसाठी घोडेबाजारी पणा करणार नाही हे आम्ही आधीच जाहीर केले होते. घोडेबाजारी पणा करून सत्ता मिळवायची आणि जनतेकडून लूट करायची हे शिवसेनेचे धोरण नसून भयमुक्त नगर आणि विकासाच्या मुद्दा हे धोरण होते. जनतेने देखील त्याप्रमाणे कौल दिला मात्र विरोधकांनी षडयंत्र करून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवले. तसेच भाजप , राष्ट्रवादी आणि अन्य पक्ष हे बुऱहानगरच्या राजांच्या इशाऱ्यावर चालतात असा टोलाही त्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.

You might also like
Comments
Loading...