या कारणामुळे लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेची सुनावणी उद्यावर

Lalu-Prasad-Yadav

टीम महाराष्ट्र देशा: सीबीआयच्या विशेष न्यायालयाने वकील विंदेश्वरी प्रसाद यांचे निधन झाल्यामुळे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेले लालूप्रसाद यादव व अन्य १६ जणांची शिक्षेची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे.

तसेच न्यायालयाने याप्रकरणी तेजस्वी यादव, रघुवंशप्रसाद सिंह, शिवानंद तिवारी आणि मनीष तिवारी यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यांना २३ डिसेंबरला देवघर कोषागारमधून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याचे न्यायालयाने सांगितले.

बिहारचे आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांशिवाय माजी मंत्री विद्यासागर निषाद आणि पीएसीचे तत्कालीन अध्यक्ष ध्रुव भगत, हार्दिकचंद्र चौधरी, सरस्वतीचंद्र आणि साधना सिंह यांची रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. न्यायालयाने लालूंसहित १६ जणांना दोषी ठरवले असून उद्या शिक्षेची सुनावणी होणार आहे.